लातूर: शिक्षण क्षेत्रात ऊल्लेखनीय कार्य करणार्या बाभळगाव येथील दयानंद शिक्षण प्रसारक मंडळात ध्वजारोहण समारंभ पार पडला. नुकतीच धिरज विलासराव देशमुख यांची दयानंद शिक्षण प्रसारक मंडळावर अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. अध्यक्ष या नात्याने धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोह केले जाणार होते. माञ या कार्यक्रमात धीरज देशमुख यांनी जानेवारी महिन्यात ज्या मुला-मुलींचा वाढदिवस आहे. अशांना मंचावर बोलवून त्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यामुळे मुले खूप आनंदी झाली. उत्साही झाली.
यावेळी बाभळगाव येथील कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष ओमप्रकाश पाटील, गंगाधर सगर, सचिव श्यामराव देशमुख, उपसचिव महादेव जटाळ, कोषा ध्यक्ष नृसिंह देशमुख, सदस्य सूर्यकांत देशमुख, आयुब महंमद हनिफ शेख, मारोती मस्के, सुवर्णा मुळे, यांच्यासह ग्रामस्थ प्राध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील कार्यक्रमास व्हा. चेअरमन श्रीशैल ऊटगे,जेष्ठ संचालक धनंजय देशमुख,जगदीश बावणे, विकासचे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष विजय देशमुख, व्यंकटराव कराड, जिल्हा बॅंकेचे संचालक नाथसींह देशमुख. कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांच्यासह खाते प्रमूख, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Comments