रेणापूर: भाजपा लातूर ग्रामीणच्या वतीने रेणापूर ते पानगाव या मार्गावर दुचाकीवरुन तिरंगा एकता रॅली काढण्यात आली. रेणापूर फाटा येथे तिरंगा एकता रॅलीचा शुभारंभ भाजप नेते रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजपचे पक्ष विस्तारक दिलीप पाटील, रेणापूर पंचायत समितीचे सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, रेणापूर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अभिषेक आकणगीरे, उपनगराध्यक्षा राबीयाबी शेख, भाजपचे जिल्हा सरचिटणीस विजय क्षिरसागर, जिल्हा परिषद सदस्य सुरेश लहाने, डॉ. बाबासाहेब घुले, पंचायत समिती गटनेते रमेश सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रेणापूर फाटा येथून दुचाकीवरुन भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीकांच्या उपस्थितीत तिरंगा एकता रॅलीस प्रारंभ झाला. पुढे रेणापूर नगरपंचायत येथे तिरंगा रॅलीचे आगमन झाले. यावेळी भारताच्या संविधानाचे वाचन करण्यात आले व रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात आला. यानंतर रेणापूर येथुन तिरंगा रॅली हनुमंतवाडी, पाथरवाडी फाटा, पन्नगेश्वर साखर कारखाना मार्गे पानगाव येथे पोहचली. दरम्यान पानगाव येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीस्थळी जाऊन रमेशअप्पा कराड व मान्यवरांनी अभिवादन केले. यानंतर येथे तिरंगा एकता रॅलीचा समारोप करण्यात आला.
तिरंगा एकता रॅलीस किशनराव भंडारे, सतीश अंबेकर, श्रीकिशन जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गोडभरले, पंचायत समिती सदस्य चंद्रकला इंगोले, चंचला घुले, बायनाबाई साळवे, संध्या पवार, नगरसेवक विजय चव्हाण, एकनाथ आकनगिरे, सुमन मोटेगावकर, सुरेखा चव्हाण, जमुनाबाई राठोड, गोजरबाई आवळे, उज्जवल कांबळे, दत्ता सरवदे, ललीता हणवते-कांबळे, गंगासिंह कदम, संपत कराड, वसंत करमुडे, कृष्णा मोटेगावकर, विठ्ठल कसपटे, संतोष चव्हाण, दगडु इंगोले, ॲङ मनोज कराड, निजाम शेख, चंद्रकांत कातळे, लक्ष्मण खलंग्रे, माधव घुले, धावणे गुरुजी, शिला आचार्य, रमेश चव्हाण, श्रीकृष्ण पवार, दिनकर राठोड, मारोती गालफाडे, श्रीमंत नागरगोजे, माऊली भिसे, भाऊसाहेब गुळभिले, किशन क्षीरसागर, मुन्ना गुर्ले, अनिल यलगट्टे, सचिन मोटेगावकर, कुलभुषण संपते,बळवंत कराड, संजय डोंगरे,सुभाष राठोड, अंतराम चव्हाण, सिद्धेश्वर मामडगे, नरसिंग येलगटे, वीरेंद्र चव्हाण, बसवराज गुरुफळे, नाथराव गित्ते, रमाकांत फुलारी, सुरेश बुड्डे्, शिवाजी जाधव, राजेंद्र आलापूरे, बालाजी केंद्रे, अजित पाटील, राजु अत्तार, किशन क्षिरसागर आदीसह रेणापूर तालुक्यातील भाजपचे विविध आघाडयांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
Comments