लातूर प्रतिनिधी : राज्यातील भारतीय जनता पार्टीचे सरकार हे केवळ घोषणाबाज सरकार आहे. या सरकारची धोरणे शेतकरी विरोधी असल्यामुळेच शेतकऱ्यांची आज वाताहात होताना दिसत आहे. सरकारची कर्जमाफीची घोषणा फसवी ठरल्यानेच शेतकरी आत्महत्येचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. सरकार मस्त, प्रशासन मस्त आणि शेतकरी त्रस्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढायचा असेल तर परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे सदस्य धीरज देशमुख यांनी केले.
औसा तालुक्यातील टाका, जायफळ, अंदोरा व बिरवली या गावांना धीरज देशमुख यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते. भाजपाने राज्याच्या सत्तेची सुत्रे हाती घेतल्यापासून जे आजपर्यंत ज्या ज्या घोषणा केल्या त्या सर्व घोषणा फसव्या ठरल्या आहेत असे नमुद करून ते म्हणाले की शेतकर्यांना कर्जमाफी दिल्याचा बनाव सरकारने केला परंतू आजपर्यंत एकाही शेतकर्याची कर्जमाफी झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले नाही. कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी, कधी पिकांवरील विविध रोगांचा प्रादुर्भाव तर कधी पदरात पडलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव यामुळे संकटात सापडलेल्या शेतकर्यांच्या शेतीपंपाची वीज तोडण्याचे काम सरकारने करून शेतकर्यांना अधिक संकटात लोटण्याचे काम केले आहे.
लोकशाहीमध्ये कोणाला निवडून द्यायचे हा अधिकार जनतेला असतो. परंतु जनतेने ज्यांना निवडून दिले त्यांनी जनतेच्या हिताचे काम करणे गरजेचे असते. दुर्देवाने लातूर जिल्हा परिषदेत असे होताना दिसत नाही. लातूर जिल्हा परिषदेत सत्ता परिवर्तन होऊन जवळपास दहा महिने होत आले आहेत. एकेकाळी राज्यात प्रथम क्रमांकावर असलेली लातूर जिल्हा परिषद आज तळाला गेली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावांचा विकास झाला पाहिजे. तो होत नाही. सत्ताधार्यांच्या निष्क्रीयेतेने गावांचा विकास ठप्प झाला आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते, नाल्याचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहेत असेही देशमुख यांनी सांगितले. ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी गावातील समस्या जाणून घेतल्या व त्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत आवाज उठविण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
यावेळी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व जि. प. सदस्य धनंजय देशमुख, विकास सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन विजय देशमुख, विकास सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन गोविंद बोराडे, जि. प. सदस्य नारायण लोखंडे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक सदाशिव कदम, उदयसिंह देशमुख, टाका येथील रामचंद्र शिंदे, गोरख सावंत, विठ्ठल लोकरे, विजयानंद गोरे, ज्योतिबा गोरे, ज्योतीबा गोरे, बंडू पाटील, पंडीत शिंदे, सुधाकर शिंदे, फुलचं मोरे, दयानंद शिंदे, धनराज गिरी, दत्ता देवासिंगकर, जिवन शिंदे, प्रकाश शिंदे, बाळू शिंदे, भगवान सावंत, वामन सावंत, जगन्नाथ शिंदे, भिमाशंकर बिडवे, नरहरी शिंदे, शिवाजी सावंत, किरण शिंदे, शिवाजी सावंत, किरण शिंदे, कुंभकर्ण शिंदे, बालाजी गोरे, शिवाजी गोरे, गौतम गोरे, विजय कदम,बिरवली येथील प्रताप कदम, गुणवंत कदम, उमाकांत पाटील, वसंत भोसले, शिवाजी गरड, ज्ञानेश्वर गरड, अशोक कदम, डॉ.नरसिंग कदम, माणिक पाटील, जायफळ येथील खंडू बिडवे, चंद्रसेन माचवे, लक्ष्मण जोगदंड, प्रकाश भोंग, लिंबराज भोंग, विलास नंदराम, राजेंद्र भोंग, श्रीहरी पाटील, मोहनराव भोंग, मधूकर भोंग, दगडू पवार, प्रसाद पाटील, अंदोरा असगर पटेल, बळवंत मुळे, शिकूर मुराद, अब्बास टेलर, गैबी पठाण, नईम पटेल, मोहन लाडे, दस्तगीर शेख, धिरज लाडे, सुधीर पवार, अशोक लोकरे, असीफ पठाण यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
Comments