HOME   लातूर न्यूज

जनतेला उत्तर द्यायचंय, सरकारला आठवण करुन द्या- आ. देशमुख

सरकारला केलेल्या कामांचा हिशोब जनतेला द्यायचा आहे!


जनतेला उत्तर द्यायचंय, सरकारला आठवण करुन द्या- आ. देशमुख

लातूर: जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची ग्वाही देवून सत्तेवर आलेल्या सरकारने जनतेचा भम्रनिरास केला आहे. केंद्र व राज्यातील सरकारला केलेल्या कामाचा हिशोब देण्यासाठी जनतेला आपण उत्तरादायी आपल्याला विसर पडला आहे. सरकारला त्याची आठवण करुन देण्याची वेळ आली असल्याचे मत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले. लातूर शहर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे वाटप माजी राज्यंत्री आमदार अमित देशमुख यांच्या हस्ते काँग्रेस भवन लातूर येथे करण्यात आले यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोईज शेख, माजी महापौर ॲड. दीपक सूळ, ॲड.समद पटेल, चाँदपाशा इनामदार, पृथ्वीराज सिरसाठ, ॲड. फारुख शेख, खाजाबानु बुऱ्हाण, सपना किसवे, नगरसेवक सचिन बंडापल्ले, कैलास कांबळे, अहमदखाँ पठाण, गौरव काथवटे, युनुस मोमीन, आसिफ बागवान, सय्यद इम्राण, आयुब मणियार, सचिन मस्के, महेश काळे आदिंची उपस्थिती होती.
लातूर शहर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीच्या नुतन पदाधिकाऱ्यांची नियुक्तीत जिल्हा अध्यक्ष ॲड. फारुख शेख यांनी सर्व समावेशक नियुक्त्या केल्या आहेत. याचा पक्षाला निश्चितच फायदा होईल असे म्हणून ॲड. फारुख शेख यांचेही आ. देशमुख यांनी कौतुक केले. यावेळी लातूर शहर जिल्हा अल्पसंख्यांक काँगेस कमिटीच्या नवनियुक्त ब्लॉक अध्यक्ष, सरचिटणीस, सचिव व प्रभाग अध्यक्षांना आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.


Comments

Top