मांजरा साखर कारखान्यावर कारखान्यांची आढावा बैठक
विलासनगर: प्रादेशिक सह संचालक (साखर), नांदेड यांच्या अंतर्गत नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांच्या २०१७-१८ मधील कामकाजाचा मासिक आढावा विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि, विलासनगर येथे घेण्यात आला. साखर आयुक्तालय, पुणे येथील साखर संचालक (प्रशासन) डॉ. किशोर तोष्णीवाल यावेळी उपस्थित होते. या बैठकीत कारखान्याकडील ऊस वजन काटे ऑनलाईन करणे, ऊस पेमेंट, दैनिक ऊस गाळप, साखर उत्पादन व उतारा, साखर विक्री, ऊस नोंदी आदी माहिती ऑनलाईन सादर करण्या बाबत चर्चा झाली. तसेच चालू हंगामासाठी उपलब्ध असलेल्या ऊस गाळप करणेसाठी लागणारा कालावधी, गळीतास आलेल्या ऊसास एफआरपी देण्यासाठी ऊस वहातुकीचे दर समान करणे, ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करणे, पाक्षिक माहिती वेळेवर सादर करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. कार्यवाही बाबतच्या सूचना संबंधित साखर कारखान्यांना देण्यात आल्या. आढावा बैठकीस उपस्थित असलेले प्रादेशिक सह संचालक (साखर), नांदेड श्रीकांत देशमुख यांना महाराष्ट्र शासनाचा साहित्य अकादमीकडून पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे व कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी सत्कार केला. या आढावा बैठकीस विशेष लेखापरिक्षक वर्ग-1, सहकारी संस्था (साखर) आरडी बिर्ले, प्रादेशिक सह संचालक (साखर), नांदेड कार्यालयाचे वाडीकर, नांदेड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयातील सहकारी व खाजगी कारखान्याचे कार्यकारी संचालक, मुख्य शेतकी अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
Comments