HOME   लातूर न्यूज

लातुरात रेल्वे डब्यांचा कारखाना, श्रेय कुणाला?

यशवंतपूरवर दोघांचा दावा, मुंबई घालवली कुणी? कुणी सांगेना


लातुरात रेल्वे डब्यांचा कारखाना, श्रेय कुणाला?

लातूर: लातूर-मुंबई रेल्वे सोडून दिल्यानं यशवंतपूर मिळाली. ती कुणी मिळवली याच्या श्रेयवादात खासदार आणि पालकमंत्रीही पडले. पण मुंबई कुणी घालवली हे मात्र दोघांनीही सांगितले नाही. आता लातूर जिल्ह्यातल्या टेंभी येथे उपनगरीय रेल्वे आणि मेट्रोचे डबे निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे अशी खात्रीची बातमी मिळाल्याने पुन्हा श्रेयासाठी चढाओढ सुरु होणार आहे. या प्रकल्पामुळे लातूर जिल्हाच नव्हे तर सबंध मराठवाड्याच्या विकासाला हातभार लागणार आहे. हा प्रकल्प सुरु झाला तर १० हजार्हून अधिक जणांना रोजगार मिळणार आहे. बुधवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद फडणवीस भेटले. उभयतात या नव्या निर्णयाबाबत चर्चा झाली. या प्रकल्पासाठी पाठपुरावा केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे अभिनंदन केल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान ०४ फेब्रुवारीपासून लातूर-यसवंतपूर सुरु होत आहे. या गाडीला उदगीर आणि भालकी येथे थांबा नव्हता. आता हे दोन्ही थांबे मिळाले आहेत. आपण केलेल्या प्रयत्नांना णि पाठपुराव्याला यश आले आहे असा दावा खा. सुनील गायकवाड यांनी केला आहे.


Comments

Top