HOME   लातूर न्यूज

सोयाबीनचा फायदा, साठेबाजांना, व्यापार्‍यांना


सोयाबीनचा फायदा, साठेबाजांना, व्यापार्‍यांना

लातूर: काही महिन्यांपूर्वी सोयाबीन २४०० रुपयांना विकले गेले. हमी भाव खरेदी केंद्रही सुरु झाले, तारण योजनाही आली. पण सरकारी योजनेतल्या जटीलपणामुळे शेतकर्‍यांनी जमेल त्या भावाने सोयाबीन विकले. दरम्यानच्या काळात सोयाबीनला काही दिवसात चांगला भाव येईल असे राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल सांगत होते. असाच प्रयत्न अनेकांनी केला. त्यान्सार साठेबाजांनी जे काय ओळखायचं ते ओळखलं. आता सोयाबीनला भाव आला आहे. परवा तर ३९७५ रुपयांनी विकले गेले. अजूनही भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा साठेबाजांनाच होणार आहे. शेतकर्‍यांना फारसं काही मिळणार नाही, व्यापार्‍यांना कमाई होणार आहे. या सोबतच सोयाबीनचे तेल १० ते २० रुपयांनी वधारणार आहे.
सोयाबीनच्या दराने विक्रम केला असून सध्या चार हजार रुपये प्रतििक्वटल दर मिळत आहे. त्यात वाढ होऊन तो पाच हजार रुपयांवर जाण्याचा अंदाज व्यापारी वर्तुळात व्यक्त केला जात आहे. ही कृत्रिम तेजी साठेबाजी करणाऱ्या मोठय़ा व्यापाऱ्यांनी केली असून त्यातून मोठी कमाई त्यांना होणार असली तरी शेतकऱ्यांना मात्र त्याचा फारसा लाभ होणार नाही. सट्टेबाजीची झळ ग्राहकांना बसणार असून १० ते २० रुपये किलोने तेल महागणार आहे.


Comments

Top