लातूर: सरकारी कर्मचार्यांची वसाहत असूनही प्रचंड घाणीत जगणार्या शासकीय कॉलनीचं नशीब खुललं आहे. या भागातला प्रचंड कचरा हटविण्याच्या मोहिमेला चक्क जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे हात लागले आहेत. या सरकारी वसाहतीतली ड्रेनेजची व्यवस्था मोडकळीस आली आहे. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य, त्यात डुकरांचा वावर, साठलेल्या घाण पाण्यातूनच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, अनेक ठिकाणचे चेंबर उघडे मोडलेले अशी अवस्था होती. या भागातील नागरिकांनी जमेल त्या, कळेल त्या कार्यालयाकडे-अधिकार्यांकडे चकरा मारल्या पण उपयोग होत नव्हता. परवा या भागातील नागरिकांनी उप महापौर देवीदास काळे यांना बोलावले परिस्थिती दाखवली. काळे यांनी जिल्हाधिकार्यांच्या कानावर ही बाब घातली. जिल्हाधिकारी तातडीने या कॉलनीत हजर झाले. बुधवारी पहिल्यांदा आपण कॉलनी स्वच्छ करुन घेऊ, प्रत्येक घरातला किमान एक माणूस आला पाहिजे असे बजावले. बुधवारी सकाळी साडेसहा वाजता ही मोहीम सुरु झाली. सगळी कॉलनी स्वस्छ केली. यानंतर, पाईप, टाक्या, चेंबर अशा बाबी दुरुस्त करुन घेतल्या जाणार आहे. मुळात या कॉलनीच्या देखभालीचे काम बांधकाम विभागाचे आहे. पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लक्ष घातल्यामुळे हे प्रकरण मार्गी लागले. यावेळी नागरिकही जमले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विपीन इटणकर, मनपा आयुक्त अच्युत हांगे, उपायुक्त त्र्यंबक कांबळे, शहर अभियंता दिलीप चिद्रे, स्वच्छता निरीक्षक रवी कांबळे, रमेश सोनवणे.
नगरसेवक शिवकुमार गवळी, नगरसेवक रागिणी यादव, दीपाताई गिते, सर्व अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
Comments