HOME   लातूर न्यूज

आदर्श मैत्री फाऊडेशनच्या पुरस्कारांचे रविवारी वितरण

माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर व पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते आदर्श रत्न होणार सन्मानीत


आदर्श मैत्री फाऊडेशनच्या पुरस्कारांचे रविवारी वितरण

लातूर: आदर्श मैत्री फाऊंडशेनच्या वतीने समाजाला आदर्श ठरणारे व शुन्यातुन विश्‍व निर्माण करणार्‍या विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदर्श रत्न पुरस्काराने गौरविण्यात करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. ४ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५ वाजता दयानंद कॉलेजच्या सभागृृहात पार पडणार आहे. माजी राज्यपाल केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असून सोहळयाच्या अध्यक्षस्थानी जिल्हयाचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची उपस्थितीत राहणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार व जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे लाभले आहेत.
शुन्यातुन विश्‍व निर्माण करुन समाजासाठी आदर्शदायी काम करणार्‍या नऊजणांना आदर्श मैत्री फाऊडेशनच्या वतीने आदर्श रत्न पुरस्काराने सन्मानीत केले जाणार आहे. पुरस्काराचे हे प्रथम वर्ष असून दरवर्षी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांनी दिली. यावर्षी देण्यात येणार्‍या पुरस्कारामध्ये आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन हजारो व्यक्तींना नवी दृष्टी देणारे प्रख्यात नेत्रतज्ञ पद्श्री डॉ. तात्याराव लहाने यांना आदर्श आरोग्य रत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे. उद्योग क्षेत्रात कार्यरत असणारे दिलीप माने यांना आदर्श उद्योगरत्न व आयबीएन लोकमत मध्ये वरिष्ठ निवेदक असणारे विलास बडे यांना आदर्श पत्रकार रत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना आदर्श शिक्षक रत्न, गायन क्षेत्रात लातूरचे नाव झळकवणारे मंगेश बोरगावकर यांना आदर्श कला रत्न, कृषी क्षेत्रात विविध प्रयोग करणारे तळणी मोहगाव येथील तुकाराम येलाले यांना आदर्श कृषी रत्न व प्रशासकीय क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवणार्‍या औश्याच्या तहसीलदार सौ. अहिल्या गाठाळ यांना आदर्श प्रशासन पुरस्कार दिला जाणार आहे. यशस्वी उद्योजिका व आदर्श गृहिणी डॉ. सौ. संगिता सारंग यांना आदर्श नारी रत्न तर समाजकारण व उद्योगात अग्रेसर असणारे तुकाराम पाटील यांना आदर्श समाज रत्न पुरस्कार देऊन गौरवित केले जाणार आहे.
पुरस्कार प्राप्त आदर्श रत्नांना सहकुटुंब सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार सोहळयाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांच्यासह फाऊंडेशनचे पदाधिकारी व पुरस्कार समितीचे सदस्य यांनी केले आहे.


Comments

Top