लातुरला रेल्वे बोगीचा कारखाना, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
लातूर: लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळावी याकरिता लातूर जिल्हयातील टेंभी येथे रेल्वे बोगी तयार करण्याच्या कारखान्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मंजुरी दिली. ही मंजुरी मिळाल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर व जिल्ह्याचे भूमीपुत्र तथा मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यु पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करुन त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळून मोठया प्रमाणात रोजगाराची संधी प्राप्त व्हावी याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरु केले होते. या प्रयत्नांतूनच लातूर जिल्हयातील टेंभी येथे रेल्वे बोगी तयार करण्याचा कारखान्याला केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मंजूरी दिलेली आहे. या कारखान्याच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यासह मराठवाडयातील तब्बल ५० हजार जणांना रोजगारांची संधी प्राप्त होणार आहे. तसेच मराठवाड्याच्या औद्योगिक व आर्थिक विकासासाठी मोठया प्रमाणात वाढ होऊन मराठवाड्याच्या विकासाला मोठया प्रमाणात गती मिळणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मराठवाड्याच्या इतिहासात प्रथमच मोठा प्रकल्प लातूर जिल्हयात उभारला जात असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळेच हे सहज शक्य झाले आहे.
Comments