लातूर : काही महिन्यांपूरर्वी अचानक कॉंग्रेसाध्क्ष व्यंकट बेद्रे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तो त्यांनी प्रदेशाक्ष अशोक चव्हाण यांना पाठवला होता. पण मंजूर झाला नव्हता. तीन चार महिने वेगवेगळ्या झाल्या, वावड्याही उठल्या, त्यातच त्यांनी व्ही मित्रमंडळ काढून वेगवेगळी आंदोलनेही केली होती. त्यांच्या सोबतीला माजी आमदार वैजनाथ शिंदेही होते. या दोघांचा राजकारणातला मूड बदलतो की काय असा अशी शंका व्यक्त केली जात होती. दरम्यान आ. अमित देशमुख आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे यांच्यात बैठक झाली. या चर्चेनंतर ॲड. बेद्रे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा परत घेण्याचे संकेत दिले आहेत. कांही दिवसापूर्वी ॲड. व्यंकट बेद्रे यांनी वैयक्तिक कारणावरुन काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला होता. मात्र हा राजीनामा पक्षाने स्विकारलेला नव्हता. बुधवारी सायंकाळी या संदर्भाने आमदार अमित देशमुख आणि ॲड. व्यंकट बेद्रे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर ॲड. बेद्रे यांनी राजीनाम परत घेवून पक्षकार्यात सक्रीय होणार असल्याचे सांगितले.
Comments