HOME   लातूर न्यूज

केंद्राला सामान्य माणसाचा विसर- बजेटवर आमदार अमित देशमुख


केंद्राला सामान्य माणसाचा विसर- बजेटवर आमदार अमित देशमुख

लातूर: केंद्र सरकारने २०१८-१९ साठी जो अर्थसंकल्प सादर केला त्यात या सरकारला सामान्य माणसाचा विसर पडल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे अशी प्रतिक्रिया भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. महागाई वाढत असताना ती रोखण्यासाठी प्रयत्न होतील आणि त्यातूनच देशातील सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र ते घडले नाही आयकराच्या स्लॅबमध्ये बदल करण्यात न आल्याने नोकरदार वर्गाचीही निराशा झाली आहे. शिक्षण आणि आरोग्य यावरील सेस ०३ टक्क्यांवरुन ०४ टक्के करण्यात आल्याने मध्यमवर्गीयांवर याचा बोझा पडणार आहे. कस्टम डयुडीत वाढ केल्यामुळे मोबाईल, टी.व्ही. त्याचप्रमाणे सौदर्य प्रसाधनांच्या किंमतीतही वाढ होणार आहे. गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत देशातील रोजगार क्षमतेत वाढ करण्यात अयशस्वी ठरलेल्या भाजप सरकारने येत्या वर्षभरात ७० लाख रोजगार उपलब्ध करुन देण्याचे गाजर दाखवले आहे. अर्थसंकल्पात केवळ मोठमोठया घोषणा करुन प्रगतीचा देखावा उभा करण्याचा केवीलवाणा प्रयत्न आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात करण्यात आलेला आहे, असेही आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे.


Comments

Top