HOME   लातूर न्यूज

टेंबी प्रकल्पासाठी संपूर्ण सहकार्य आणि पाठिंबा - आ. अमि देशमुख

केंद्र शासनाच्या इतर घोषणाप्रमाणेच टेंबी प्रकल्पाचेही होवू नये!


टेंबी प्रकल्पासाठी संपूर्ण सहकार्य आणि पाठिंबा - आ. अमि देशमुख

लातूर: लातूर जिल्हयातील औसा तालुक्यात टेंबी येथे रेल्वे बोगी तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यासंदर्भात रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी हिरवा कंदील दाखविला आहे, ही खूपच आनंदाची बाब आहे. या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून या प्रकल्पास आपले संपूर्ण सहकार्य आणि पाठींबा राहील, असे माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे. रेल्वे बोगी तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यासंदर्भात जाहीर झालेल्या निणर्यावर प्रतिक्रीया व्यक्त करताना आमदार देशमुख म्हणाले की, रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांनी हा प्रकल्प लातूर जिल्हयात व्हावा या संदर्भाने निर्णय घेतला आहे. त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त करतो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हयाचे पालकमंत्री संभाजीराव पाटील यांनी पाठपुरावा करुन हा प्रकल्प लातूरला व्हावा यासाठी प्रयत्न केले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो आहे असे सांगून लातूरचे खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी आपल्या मतदारसंघात केंद्राचा हा प्रकल्प यावा म्हणून जे प्रयत्न केले आहेत त्यांचेही अभिनंदन आणि आभार व्यक्त करत असल्याचे आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.
लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख केंद्रात मंत्री असताना त्यांनी टेंबी येथे केंद्रीय प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी त्यावेळी अधिगृहीत केलेल्या जागेवरच हा रेल्वे बोगी तयार करण्याचा प्रकल्प होणार आहे, याचे आपणाला आणि लातूरकरांना मनस्वी समाधान असल्याचेही आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
मागच्या तीन वर्षात केंद्र आणि राज्य शासनाने अनेक निर्णय जाहीर केले आणि घोषणाही केल्या आहेत परंतु त्याचे पुढे काहीच झालेले नाही. आज जाहीर झालेल्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाबाबत ठळक उल्लेख झालेला नाही. त्यामुळे त्या संदर्भात अधिक स्पष्टता होणे गरजेचे आहे. केंद्र शासनाच्या इतर घोषणाप्रमाणेच टेंबी प्रकल्पाचेही होवू नये एवढी अपेक्षा असल्याचेही शेवटी आमदार अमित देशमुख यांनी म्हटले आहे.


Comments

Top