लातूर: महाराष्ट्रातील अनेक जिल्हा बॅंका अडचणीत असताना लातूर जिल्हा मध्यार्ती सहकारी बॅंकेचे कामकाज, आर्थिक उलाढाल, शेतकर्यांना मदत करण्यासोबतच सहकारातून शून्य टक्के एनपीए असणारी हाय मॉडेल म्हणून उल्लेख करावा लागेल असे उद्गार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी काढले. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन इटनकर या तिघांनी एकाच वेळी जिल्हा बॅंकेला सदिच्छा भेट दिली. राज्यातील अनेक जिल्ह्यात आपण काम केले असून सहकार क्षेत्रामध्ये काम करीत असताना राजकारण न आणता काम केल्यास बॅंकेची प्रगती निश्चितपणे होते लातूर जिल्हा बॅंक त्याचे उदाहरण आहे असेही जिल्हाधिकारी म्हणाले. लातूर जिल्हा बॅंकेचे काम आणि प्रशासन गतीमान आहे असे राठोड म्हणाले. लातूर जिल्हा बॅंकेचे प्रशासन आणि विस्तार उत्तम आहे. ही बॅंक भविष्यात राज्यात अग्रणी रहावी अशा सदिच्छा इटनकर यांनी दिल्या. यावेळी बॅंकेचे अध्यक्ष श्रीपतराव काकडे, कार्यकारी संचालक एचजे जाधव उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाट, संचालक नाथसिंह देशमुख, भगवान पाटील, संभाजी सूळ, प्रमोद जाधव, व्यंकटराव बिरादार, शिवकन्याताई पिंपळे, स्वयंप्रभा पाटील, श्रीरंग दाताळ, पत्रकार हरिराम कुलकर्णी, अधिकारी उपस्थित होते. या तीनही बड्या अधिकार्यांच्या हस्ते बॅंकेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.
Comments