HOME   लातूर न्यूज

पालकमंत्र्यांमुळे ६८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आधार


पालकमंत्र्यांमुळे ६८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आधार

निलंगा: आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आधार दिला आहे. स्वतःच दुःख विसरत ५३ विधवा महिला स्वतःच्या पयावर उभ्या राहिल्या. त्यांना मिळालेली मदत एवढी मोलाची ठरली आहे की आता त्या मनाने कणखर झाल्या आहेत. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असून त्या आता स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. निलंगा येथील औद्योगिक वसाहतीच्या शेजारी असणार्‍या सरिता हेरीटेजमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांसोबत पालकमंत्री निलंगेकर यांनी संवाद साधला. यावेळी उपजिल्हाधिकारी भगवान आगे, तहसीलदार विक्रम देशमुख, नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, डॉ. विकास देशमुख, नरसिंग झरे, बांधकाम सभापती सुमन हाडोळे, पाणी पुरवठा सभापती शरद पेठकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सततचा दुष्काळ यातून कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍यांनी नापिकी आणि कर्जास कंटाळून आत्महत्या केली. यातून त्यांचे कुटुंबिय उघड्यावर आले. आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आधार देण्यासाठी पालकंत्री संभाजी पाटील मोठ्या भावाच्या भूमिकेतून पुढे आले. मुंबई येथील काऊ फांऊडेशनच्या साह्याने या भगिनींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली. आतापर्यंत ६८ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आधार देण्यात आला आहे.


Comments

Top