HOME   लातूर न्यूज

व्यापार्‍यांमुळे लातूर मनपाचे नुकसान-आयुक्त


व्यापार्‍यांमुळे लातूर मनपाचे नुकसान-आयुक्त


लातूर: लातूरच्या पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित केल्याच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त आच्युत हांगे यांच्याशी चर्चा केली असता, लातूर मनपाची अर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. मनपा चालवायला दर महिन्याला ५ कोटी रुपये लागतात. एलबीटीपोटी शासनाकडून सव्वाकोटी मिळतात, तर महिनाभरात १ कोटीपर्यंतच वसुली होते. उर्वरीत २ कोटी ७५ लाख रुपये आणायचे कुठून असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
लातूर शहराला एलबीटी पोटी १ कोटी २५ लाख रुपये मिळतात. लातूरसोबत अस्तित्वात आलेल्या परभणी मनपाला १ कोटी ५४ लाख, तर चंद्र्पूरसारख्या मनपाला ४ कोटी ५० लाख मिळतात. खरे तर लातूरला एलबीटीपोटी शासनाकडून किमान ७ कोटी मिळायला हवे होते. लातूरच्या व्यापार्‍यांनी एलबीटीच्या व्यवस्थीत भरला असता तर शासनाकडून जास्तीचे अनुदान मिळाले असते. कारण एलबीटीच्या आधारावरच जीएसटीचे अनुदान मिळत आहे आणि जकातीच्या आधारावर एलबीटी मिळत होता. त्यामुळे व्यापार्‍यांनी एलबीटी व्यवस्थित भरला असता तर मनपाला दरमहा ७ कोटी रुपये मिळाले असते. हे सर्व नुकसान व्यापार्‍यांमुळे झाले असल्याचे मनपा आयुक्त आच्युत हांगे म्हणाले.


Comments

Top