HOME   लातूर न्यूज

जिल्हा परिषदेच्या वतीने पालकमंत्र्यांचा सत्कार

रेल्वेच्या बोगी तयार करण्याच्या कारखान्याने सगळीकडे उत्साह


जिल्हा परिषदेच्या वतीने पालकमंत्र्यांचा सत्कार

लातूर: लातूर जिल्हयासाठी रेल्वेच्या बोगी तयार करण्याचा कारखाना मंजूर करुन घेऊन बेरोजगांरासाठी रोजगार उपलब्ध करुन दिल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या वतीने अध्यक्ष मिलिंद लातूरे व उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा सत्कार करुन आभार मानले. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्याकडे पाठपुरावा करुन लातूर जिल्हयासाठी रेल्वे बोगी तयार करण्याचा कारखाना मंजूर करुन घेतला. औसा तालूक्यात टेंभी येथे हा कारखाना होणार आहे. या माध्यमातून संपूर्ण जिल्हयात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील युवकांना मोठी संधी मिळणार आहे. लातूर जिल्हयासाठी मंजूर झालेला केंद्र शासनाचा हा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन पालकमंत्र्यांनी हा प्रकल्प मंजूर करुन घेतला. पालकमंत्र्यांचे लातूर शहरात आगमन होताच. अध्यक्ष मिलिंद लातूरे व उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी शाल, श्रीफळ, पुष्पहार घालून पालकमंत्र्यांचा सत्कार केला. यावेळी निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, समाजकल्याण सभापती संजय दोरवे, नगरसेवक गुरुनाथ मगे, शिरीष कुलकर्णी, नगरसेविका वर्षा कुलकर्णी आदींसह जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.


Comments

Top