लातूर: साखरेच्या भावात घसरण झाल्याने कारखानदार आणि ऊस उत्पादक अडचणीत आला आहे. केंद्र सरकारच्या सुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योगही संकटात येत आहेत. याचा परिणाम शेती आणि शेतकर्यांवर होत आहे. साखरेच्या भावामुळे ऊसालाही कमी भाव मिळतो आहे. सरकारने पाच हजाराचा हमी भाव देऊन साखर खरेदी करावी अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. देशातील १३० कोटी लोकांना साकरेच्या एकूण उत्पादनापैकी १७ टक्के साखर सरळ रुअपात खायला वापरली जाते, ८३ टक्के साखर मिठाई उद्योगाला १५ टक्के, बिस्कीट-चॉकलेट २० टक्के, मेडीकल क्षेत्राला ३० टक्के तर शितपेयांना १८ टक्के साखर लागते. मिठाई उद्योग ३०० रुपयांनी साखर विकतो त्यात १० फायदा होतो, चॉकलेटचा नफा १०० पटीत आहे. मेडीशनचा नफा ६०० पट आहे. साखरेला भाव मिळाल्याशिवाय ऊसाला नफा मिळत नाही. त्यामुळे साखरेलाही पाच हजारांचा भाव देऊन सरकारने खरेदी करावी अन्यथा संघटना रस्त्याव्र उतरेल असा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी दिला आहे.
Comments