HOME   लातूर न्यूज

खासदार उदगिरात खरे बोलले, रेल्वे विस्तार माझ्यामुळेच!


खासदार उदगिरात खरे बोलले, रेल्वे विस्तार माझ्यामुळेच!

उदगीर: मुंबई ते लातूर एक्सप्रेस या रेल्वेचा बीदर ते मुंबई असा विस्तार माझ्यामुळेच झाला आहे. ही रेल्वे नियमित करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी रेल्वेमंत्र्याची भेट घेऊन पाठपुरावा सुरू ठेवला असल्याचे सांगून उदगीर हे महत्वाचे केंद्र असून या मार्गावरून अनेक रेल्वे सुरू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन खा. डॉ. सुनिल गायकवाड यांनी काल उदगीरमध्ये लातूर-यशवंतपूर एक्सप्रेसच्या स्वागताप्रसंगी केले. लातूर येथे होणार्‍या रेल्वे बोगी कारखान्याचे श्रेय हे फक्त भाजपाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यशवंतपूर ते बीदर या एक्सप्रेस रेल्वेचा विस्तार काल लातूरपर्यंत करण्यात आला. लातूर ते यशवंतपूर एक्सप्रेस या रेल्वेचे काल ४.४५ वाजता उदगीरकरांनी जंगी स्वागत केले. यावेळी लातूरहून या रेल्वेमध्ये खा. डॉ. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव, भाजपाचे नगराध्यक्ष नागनाथ निडवदे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी पहिला प्रवास करून उदगीरमध्ये दाखल झाले. यावेळी पत्रकारांनी मुंबई ते बीदर एक्सप्रेस नियमित करण्यासाठी खा. गायकवाड यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले मुंबई बीदरचा विस्तार माझ्याच प्रयत्नामुंळे झाला असून ही रेल्वे नियमित करण्यासाठी प्रयत्न सुरूच आहेत. पंतप्रधान मोदी व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लवणार आहे. तसेच उदगीर हे महत्वाचे केंद्र असून या मार्गावर अनेक रेल्वे सुविधा उपलब्ध करून देऊन उदगीरचे रेल्वे स्थानक एक मॉडेल करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रेल्वे बोगीच्या लातूर येथील मंजूर झालेल्या कारखान्यासंदर्भात हे श्रेय फक्त भाजपाचेच असल्याचे त्यांनी सांगितले.


Comments

Top