लातूर: १२ फेब्रुवारीपासून पुढच्या २४ तासात मराठवाड्यातील काही जिल्ह्यात गारपीट आणि पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. सर्व तालुक्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे कक्ष २४ तास कार्यरत ठेवावेत, काही हानी झाल्यास त्याची माहिती तातडीने द्यावी, य अकआळात विजा पडण्याची शक्यता असल्याने नागरिक आणि शेतकर्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, दुपारी तीन ते सात या काळात विजा पडण्याची शक्यता असल्याने या काळात शेतीची कामे करु नयेत, जनावरे आणि धान्य सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, विजेच्या तारांपासून दूर रहावे अशा आशयाचे आदेश जिल्ह्यातील सर्व तहसिलदारांना देण्यात आले आहेत.
Comments