HOME   लातूर न्यूज

राष्ट्रीय लोकअदालतीत ५१४ प्रकरणे तडजोडीने निकाली


राष्ट्रीय लोकअदालतीत ५१४ प्रकरणे तडजोडीने निकाली

लातूर: राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये लातूर जिल्ह्यात एकूण ५१४ प्रकरणात तडजोड होऊन रुपये १८ कोटी १८ लाख ८३ हजार १६५ रुपये रकमेची वसुली झाली. त्यापैकी न्यायालयात प्रलंबित असलेल्या भूसंपादनाची ७० प्रकरणात तडजोड होवून १२ कोटी ८७ लाख ८६ हजार ५५४ रुपयांचा मावेजा व मोटार अपघात दाव्यात १८ प्रकरणात तडजोड होवून ०१ कोटी ०३ लाख १५ हजार रुपयांचा मावेजा व इतर अशी एकूण ४४७ प्रकरणात तडजोड होवून १७ कोटी ३८ लाख ९८ हजार ७६ रुपयांचा मावेजा देण्यात आला आणि ६७ दाखलपूर्व प्रकरणात तडजोड होऊन रुपये ७९ लाख ८५ हजार ८९ रुपयांची वसुली झाली.
या लोकअदालतीचा उद्घाटन कार्यक्रम जिल्हा व सत्र न्यायाधिश न्या. श्रीमती व्हीव्ही जोशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधिश निलंगा न्यायमूर्ती एसव्ही रणपिसे, जिल्हा न्यायाधिश एसएम शिंदे, जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड. एनव्ही काकडे, सहायक सरकारी वकील ॲड. एस.एस.रांदड हे उपस्थित होते. या लोकअदालतीमध्ये मोटार अपघात दावा, भूसंपादन, दिवानी प्रकरणे, कलम १३८ एन आय ॲक्ट, विवाह कायदा प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी, सहकार, औद्योगिक आणि कामगार न्यायालयाची अशी २५७५ प्रलंबित प्रकरणे, तसेच विविध बँका, टेलीफोन कंपनी, फायनान्स कंपनी यांची ३४४२ वादपूर्ण प्रकरणे अशी एकूण ६०१७ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.


Comments

Top