लातूर: नुकत्याच झालेल्या बिनमोसमी पावसामुळे व गारपिटीमुळे लातूर व रेणापूर तालुक्यातील अनेक शेतकर्यांच्या हाताशी आलेल्या गहु, ज्वारी, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याची माहिती मिळताच लोकनेते माशिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनानुसार जननायक संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने लातूर तालुक्यातील गारपीटग्रस्त गोंदेगाव, खंडाळा, खुंटेफळ या गावातील शेतीची पाहणी करण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकाचे पंचनामे त्वरीत करून त्यांना एकरी पंचवीस हजार रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे याना देण्यात आले.
यावेळी जननायक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष निळकंठराव पवार, रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे घनसरगावकर, युवा तालुकाध्यक्ष श्रीकांत झाडके,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नवनाथ शिंदे, नुकसानग्रस्त शेतकरी धनंयजय देशमुख, गोविंद गुरसुळकर, राम शिंदे, खंडाळाचे चेअरमन शेषेराव पाटील, उपसरपंच भानुदास पानढवळे आदी उपस्थित हेाते. गोंदेगाव तसेच खंडाळा येथील सौ.कांताबाई झाडके यांचे ज्वारी व हरभरा, हरिश्चंद्र पानढवळे, भास्कर झाडके, नामदेव शिंदे, रावसाहेब झाडके, श्रीकांत झाडके तसेच राम हरी शिंदे यांच्या गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून खुंटेफळ येथील शेतकरी माधव शिंदे, श्रीराम शिंदे, अमृत शिंदे, शाहुराज पिसाळ, धनयंय देशमुख यांच्या शेतीत जाऊन जननायक संघटनेचे पदाधिकारी व तहसिलचे मंडळाधिकारी राहुल पत्रिके, तलाठी सौ.पी.एच.वडवणकर, सौ.सुडे बी.बी, यांच्यासह तालुका कृषी विभागाचे अधिकारी यांनी यावेळी पिकाची पाहणी केली. या गारपीट व बिनमोसमी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे शासनाने त्वरीत पंचनामे करून नुसान भरपाई देण्यात यावी अशी आग्रही मागणी जननायक संघटनेच्या वतीने शासनाकडे करण्यात आली आहे.
Comments