HOME   लातूर न्यूज

तळ्याच्या काठी, सावलीची दाटी, काही गुजगोष्टी तुझ्या माझ्या.....

नाही तर व्हॅलेंटाईन रॅलीही निघाल्या असत्या!


तळ्याच्या काठी, सावलीची दाटी, काही गुजगोष्टी तुझ्या माझ्या.....

लातूर: आज व्हलेंटाईन डे. लातुरच्या पोलिसांनी कॉफी शॉपवाल्यांचा धंदा पुरता मारुन टाकला. काही कॉफी शॉप चालू आहेत. तिथे सभ्यपणे हितगुज चालताना दिसलं. अनेकांनी मात्र शहराबाहेरचा आसरा घेतला. औसा रोड, अंबाजोगाई रोड, नागझरी, साई बंधारा, बागा, रया गेलेले आंबेडकर उद्द्यान. कुणी जवळच्या छोट्या गावांना नुसते जाऊन येणे पसंत केले. काहींनी हिंमत करुन नाना नानी पार्कचाही आधार घेतला. अनेकांना पीव्हीआर थिएटरचा आणि त्याच्या परिसराचा आधार मिळाला. अनेकांनी मोबाईलवरुन व्हिडीओ चॅटींग केले. चांगली हॉटेल्स आणि सिनेमागृहांना आजका दिन अच्छा गेला. दरवर्षी व्हॅलेंटाईन डेला काही संघटना आधीच डरकाळ्य अफोडत असतात. अशा डरकाळ्या यंदा ऐकू नाही आल्या. चौका चौकात मात्र आसाराम बापू चमकत होते. आज मातृ पितृ दिन पाळा अशा आशयाची पोस्टर्स त्यांच्या अनुयायांनी लावली होती. तोंडाला रुमाल बांधून मोटारसायकलवर मागे बसून जाणार्‍या तरुणींची संख्या अधिक होती. मोबाईल, एसएमएस, व्हिडीओ कॉलींग सोपे आणि स्वस्त झाल्यानं व्हॅलेंटाईन डे रोजच साजरे होत असतात. त्यामुळे आजच्या दिवशी फारसा फरक दिसला नाही. अलिकडे जयंतीच्या एक दिवस आधी मिरवणूक काढली जाते, जयंतीदिनीही काढली जाते. जयंतीतल्या मिरवणुकांचे आकारही हल्ली मोठे होत जाताना दिसतात. त्याचं वारं मात्र आजच्या दिवसाला लागलेलं दिसलं नाही. नाही तर व्हॅलेंटाईन रॅलीही निघाल्या असत्या!


Comments

Top