लातूर: राज्यात प्रथमच दोन दिवसात गारपीटग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण केले असून गारपीटग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी माहिती लातूर विमानतळावर पत्रकाराशी बोलतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लातूर विमानतळावर आगमन व बीडकडे प्रयाण झाले. लातूर विमानतळावर पुण्याहुन आगमन झाल्यावर पत्रकारांशी औपचारिकपणे बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्यांच्या सोबत राज्याच्या ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे होत्या. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी आ. विनायकराव पाटील, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, महापालिका आयुक्त अच्युत हंगे, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर आदीसह मोठया प्रमाणावर भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. लातूर विमानतळावरून मुख्यमंत्री फडणवीस यांनी हेलिकॅाप्टरने बीडकडे प्रयाण केले.
Comments