लातूर: लातूर जिल्हा दिव्यांग मुक्त करण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी पूर्वी केली होती. त्यानुसार जिल्हयातील दिव्यांगावर उपचार करण्यासाठी ५० दिव्यांगाचा एक गट उपचारासाठी शिर्डी येथे रवाना झाला असून पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिव्यांगाच्या वाहनाला हिरवा झेंडा दाखविला. अक्का फाऊंडेशनच्या वतीने दिव्यांगाना उपचारासाठी शिर्डी येथे पाठविण्यात आले आहे. या उपक्रमात जाण्या-येण्यासाठी लागणारा खर्च फाऊंडेशन करणार आहे. गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री संभाजीराव पाटील यांनी शिर्डीला जाणार्या दिव्यांगाच्या वाहनांना हिरवा झेंडा दाखविला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन ईटनकर, महापालिका आयुक्त अच्युत हंगे यांच्यासह अधिकारी व पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
Comments