HOME   लातूर न्यूज

कल्पना गिरी प्रकरणी विक्रमसिंग चौहान यांना जामीन


कल्पना गिरी प्रकरणी विक्रमसिंग चौहान यांना जामीन

लातूर: अनेक वर्षांपासून गाजत असलेल्या कॉंग्रेस कार्यकर्त्या कल्पना गिरी खून प्रकरणातील आरोपी विक्रमसिंग चौहान यांना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन दिला आहे. चौहान यांना हृदयावरची शस्त्रक्रिया करायची आहे. त्यासाठी त्यांनी मागच्या वर्षीच जामीनासाठी अर्ज केला होता. सुमारे तीन वर्षांपासून चौहान कारावासात आहेत. विक्रमसिंग चौहान विरुद्ध सीबीआय अशा प्रदीर्घ सुनावणीनंतर १५ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला. पुणे येथे राहूनच उपचार घ्यावेत अशी अट चौहान यांना घालण्यात आली आहे.


Comments

Top