लातूर: एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, लातूर व छत्रपती महोत्सव समिती, अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त अहमदपूर येथे मोफत महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. या आरोग्य शिबीरात विविध आजारांच्या ४२१ रुग्णांची आरोग्य तपासणी करुन प्राथमिक उपचार करण्यात आले. या आरोग्य शिबीराचे उद्घाटन आमदार विनायकराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रकाश देशमुख, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, भाजप युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड. अमित रेड्डी, भाजपा तालुकाध्यक्ष राम बेल्लाळे, बबनराव हांडे, राजाभाऊ खंदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या आरोग्य शिबीरात ऱ्हदयरोग, कर्करोग, मुत्रपिंड, मुत्राशयाचे आजार, पोटाचे विकार, नेत्ररोग, मेंदु व मज्जासंस्था विकार, स्त्रीयांचे विविध आजार, त्वचारोग, अस्थीव्यंग, कान-नाक-घसा आजार, बालरोग, फुप्फुसाचे विविध आजार, दातांचे आजार या आजाराच्या रुग्णांची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करुन प्राथमिक उपचार करण्यात आले. तसेच दिर्घ आजाराच्या १०८ रुग्णांना पुढील उपचारासाठी लातूर येथील यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय येथे पाठवण्यात आले.
या महाआरोग्य शिबीरात डॉ. आशीष कुंडलवार, डॉ. साफल्य कडतने, डॉ. राजेश विरपक्षे, डॉ. पार्थ पाटंगेकर, डॉ. नागेश माने, डॉ. आरती अबंग, डॉ. मंजुर, डॉ. अंकिता दाड, डॉ. अमरीश मदाने, डॉ. ठाकुर, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता गणेश कराड, फार्मासिस्ट एस. के. रासुरे, पी. व्ही. जोशी, दत्ता मुंडे यांनी सेवा बजावली.
Comments