HOME   लातूर न्यूज

गुगळे मेमोरियल हॉस्पिटलला स्वच्छेतचा प्रथम पुरस्कार


गुगळे मेमोरियल हॉस्पिटलला स्वच्छेतचा प्रथम पुरस्कार

लातूर: येथील डॉ.एस.बी.गुगळे मेमोरियल हॉस्पिटलला केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छ हॉस्पिटलचा प्रथम पुरस्कार देवून लातूर महानगरपालिकेने गौरव केला आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.दिपक गुगळे व डॉ.मेघना गुगळे या दाम्पत्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. स्वच्छतेच्या बाबतीत केंद्र शासनाने अनेक निकष निश्‍चित केले होते. या विविध निकषानुसार हॉस्पिटलमधून स्वच्छ हॉस्पिटलचा प्रथम पुरस्कार डॉ.एस.बी.गुगळे मेमोरियल हॉस्पिटलला लातूर शहर महानगर पालिकेचे आयुक्त अच्युत हंगे यांच्या हस्ते प्र्रदान करण्यात आला. गुगळे मेमोरियल हॉस्पिटल स्थापनेला ५५ वर्षे पूर्ण झाली आहेत. ५ मे १९६२ साली कै.डॉ.सुवालाल गुगळे यांनी हे हॉस्पिटल सुुरु केले होते. या हॉस्पिटल मध्ये स्वच्छतेचा स्वतंत्र विभाग असून, तीन शिफ्टमध्ये आठ कर्मचारी आणि एक सुपरवायझर दिवसरात्र काम करतात. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच निटनेटकेपणा आणि स्वच्छता प्रकर्षाने जाणवते.विशेष म्हणजे या पुरस्काराचे श्रेय डॉ.दिपक गुगळे व डॉ.मेघना गुगळे यांनी कर्मचार्‍यांना दिले आहे.


Comments

Top