HOME   लातूर न्यूज

स्वस्त धान्य दुकानदार संपावर


स्वस्त धान्य दुकानदार संपावर

लातूर; रास्त भाव दुकानदारांच्या विविध मागण्या सोडविण्याचे आश्वासन देऊनही त्यांची अंमलबजावणी होत नसल्याने राज्यव्यापी संपात १ एप्रिलपासून लातूर जिल्यातील स्वस्त धान्य दुकानदार सहभागी झाले आहेत. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार, केरोसीन परवानाधारक महासंघ यांनी संपाची हाक दिली आहे. जिल्हा संघटनेच्या वतिने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना सोमवारी देण्यात आले. मुंबईच्या आझाद मैदानावर १९ मार्च रोजी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट, मुख्य सचिव महेश पाठक यांनी दुकानदारांच्या मागण्यांवर चर्चा केली. ही चर्चा निष्फ़ळ ठरल्याने संघटनेचे अध्यक्ष गजानन बाबर, काकासाहेब देशमुख व कोअर कमिटीने १ एप्रिलपासून धान्य न उचलण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील दुकानदारांनी संपात सहभाग घेत धान्य न उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष हंसराज जाधव, जिल्हाध्यक्ष आर.आर.जोगदंड, सादिक शेख, रमेश देशमुख, रेखा कदम, शुभांगी पिसाळ, भुजंग पाटील, श्रीकृष्ण पिटले आदीजण उपस्थित होते.


Comments

Top