HOME   लातूर न्यूज

सरकारने बंद साखर कारखाने चालू करावेत

तांत्रिक सल्ला आम्ही मोफत देऊ- आमदार अमित देशमुख


सरकारने बंद साखर कारखाने चालू करावेत

लातूर: शेतकऱ्यांना आर्थिकदृष्या संपन्न करावयाचे असेल तर शेतीमालाला हमी भाव दिला पाहिजे. ऊस हे खात्रीशीर येणारे आणि बऱ्यापैकी भाव मिळणारे एकमेव पीक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी मोठया प्रमाणात ऊस लागवड के्ली आहे. आगामी गळीत हंगामात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे सरकारने लातूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरु करावेत गरज भासल्यास आम्ही तांत्रिक सल्ला मोफत देऊ असे प्रतिपादन आमदार अमितदेशमुख यांनी केले. उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत विविध विकास कामांचा कार्यरंभ व शेतकरी मेळाव्याचेआयोजन श्रीगणेश मंदीर शेजारी, नवा मोंढा उदगीर येथे गुरुवार (दि.५) रोजी करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड.व्यंकटराव बेद्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विक्रम हिप्परकर, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, दिलीप पाटील नागराळकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज सिरसाट, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, उदगीर कृउबा सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, विलास कारखान्याचे उपाध्यक्ष गोविंद बोराडे, विजय निटुरे, मन्मथ कीडे, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस उषा कांबळे, जिल्हा परिषदचे गट नेते संतोष तिडके, चंद्रकांत मद्दे, महेश दंडे, शशिकांत बनसोडे, सोपानराव ढगे व्यंकटेश पुरी, आदी उपस्थित होते.
मांजरा परिवारातील साखर कारखान्याच्या माध्यमातून या वर्षी जवळपास ३० लाख मेट्रीक टनाचे गाळप करण्यात आले आहे. यातून शेतकऱ्यांना ६०० कोटी रुपये ऊस बिलापोटी मिळाले आहेत. हा सर्व पैसा लातूर जिल्ह्यातील बाजारपेठेत येवून व्यापार वाढत आहे असे सांगून आमदार अमित देशमुख पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने बंद असताना मांजरा परिवारातील साखर कारखाने चांगल्या नियोजनामुळे चालू आहेत. सध्या शेतीतील पिकांना हमी भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांनी वांरवांर आमच्याकडे बंद साखर कारखाने सुरु करण्याबाबत मागणी केली आहे. आम्ही ही सरकारला वांरवांर बंद कारखाने सुरु करण्याचे निवेदन दिले आहे. परंतू यांना कारखाने सुरु करावयाचे नाहीत. उलट चालू असलेल्या कारखान्यावर अनेक निर्बंध लावण्यात येत आहेत. सरकारने बंद पडलेले कारखाने चालू करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा गरज भासल्यास आम्ही त्यांना तांत्रीक सल्ला मोफत देवू असे म्हणून आमदार देशमुख यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर व शेतकरी विरोधी धोरणावर सडकून टिका केली.


Comments

Top