लातूर: लातूर शहरातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, ज्या नागरिकांनी त्यांचे घरगुती नळ जोडणी अनधिकृतरित्या घेतली आहे, अशा सर्व नळजोडणी धारकांनी त्यांची अनधिकृत घेतलेली नळजोडणी अधिकृत करुन घेण्याची सुवर्णसंधी महानगरपालिके तर्फे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. लातूर शहर महानगरपालिकेने सर्वसाधरण सभा दिनांक १३ ऑक्टोबर २०१७ अन्वये सर्वानुमते पारीत केला असून अनधिकृत नळ जोडणीधारकांना एक वर्षाची पाणीपट्टी व नळजोडणी घेण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रचलित नियमानुसार आकारण्यात येणारे शुल्क भरुन त्यांची नळजोडणी अधिकृत करुन घेता येणार आहे. तरी नागरिकांनी या सुवर्णसंधीचा फायदा घेऊन त्यांची अनधिकृत असलेली नळजोडणी अधिकृत करुन घ्यावी, असे आवाहन आयुक्त लातूर शहर महानगरपालिका, लातूर यांनी केले आहे.
Comments