लातूर: विलास सहकारी साखर कारखाना लि., वैशालीनगर, निवळीच्या कार्यक्षेत्रात ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. ऊसाचे प्रति एकरी टनेजमध्ये देखील वाढ झाली आहे. या तुलनेत साखर कारखान्या समोर ऊसतोडणी मजुरांची उपलब्धता दिवसेदिवस अपूरी होत आहे. मजूरांची टंचाई व कमी झालेली कार्यक्षमता यामूळे ऊसतोडणी कार्यक्रमास विलंब होत आहे. यातून सभासद व ऊसउत्पादक शेतकरी यांना अनेक अडचणींना तोड दयावे लागत आहे, ही परिस्थिती पाहता कारखान्याचे संस्थापक चेअरमन आमदार अमित विलासराव देशमुख यांनी ऊसतोडणी यांत्रीकीकरण योजना राबविली आहे. या योजनेतंर्गत करार पूर्ण झाले असून १५ अत्याधुनिक यंत्र खरेदी करण्यात येणार आहेत. या यंत्राच्या सहाय्याने पुढील हंगापासून ऊसतोडणी करण्यात येणार आहे.
विलास सहकारी साखर कारखान्याच्या ऊसतोडणी यांत्रीकीकरण योजनेतर्गत ऊसतोडणी यंत्र खरेदी करणाऱ्या खरेदीदारा सोबतचे करार पूर्ण झाले आहेत. आज बाभळगाव निवासस्थानी संस्थापक चेअरमन आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेट घेऊन यंत्र खेरदीदारांनी या योजनेत समोवेश केल्या बददल त्यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन गोविंद बोराडे, विकासरत्न मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन जगदिश बावणे, कार्यकारी संचालक समिर बी. सलगर, संचालक युवराज जाधव, आनंद बारबोले, नरसिंग बुलबुले, जनार्दन टेकाळे, बालाजी सांळूके, उमेश बेद्रे, रमेश थोरमोटे पाटील, जयचंद भिसे, माजी संचालक गुरूनाथ गवळी, कार्यलक्षी संचालक एस.व्हि.बारबोले, ऊसविकास अधिकारी दिलीप कदम आदींची उपस्थिती होती. कारखाना ऊसतोडणी यांत्रीकीकरण योजनेतर्गत १५ ऊसतोडणी यंत्र खरेदी करण्यात येणार आहेत. ऊसतोडणी यंत्र प्रकल्प खर्च १ कोटी रूपये आहे. यामध्ये यंत्र खरेदीदाराचे १५ लाख रूपये, कारखाना बीगरव्याजी अर्थसहाय्य २० लाख रूपये व ऊर्वरीत रक्कम बॅक कर्ज राहणार आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक समीर बी. सलगर यांनी दिली आहे.
Comments