लातूर: लातूर लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष तथा जि.प. सदस्य धीरज देशमख यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिरशी ता. लातूर येथे आधार फांउडेशन, धनेगाव ता. लातूर, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान ता. लातूर, कै. बब्रूवान विठ्ठलराव काळे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, लातूर व प्राथमिक आरोग्य केंद्र बोरी यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन सिरशी ता. लातूर, येथे करण्यात आले होते. या शिबिरात १६४ रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती शिबिराचे आयोजक आधार फांउडेशनचे अध्यक्ष तथा रेणा साखरचे संचालक प्रविण हणमंतराव पाटील यांनी दिली आहे. युवा नेते धिरजभैय्या विलासरावजी देशमख यांच्या वाढदिवसानिमित आयोजित करण्यात आलेल्या सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे उदघाटन माजी जि.प. अध्यक्ष संतोष देशमुख व लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष दगडुसाहेब पडिले यांनी केले. तर प्रमुख् पाहुणे म्हणून विलास कारखान्याचे संचालक युवराज जाधव, पं.स.चे माजी उपसभापती अरुण चामले व पं.स.चे माजी सदस्य बादल शेख यांची उपस्थिती होती.
सर्वरोग निदान व उपचार शिबीरामध्ये संधिवात, आमवात, पोटाचे विकार, मधुमेह, रक्तदाब, त्वचा विकार, गुप्तरोग इत्यादि आजारावर मोफत उपचार करण्यात आले. त्याचप्रमाणे लिव्हर फंक्शन टेस्ट, थॉयराईड, कोलेस्टेराट्रॉल, कॅलशिय, किडनी फंक्शन टेस्ट इत्यादी आजारांच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या त्यांचे चाचणी रिपोर्ट्स बुधवारी सिरशी येथे आधार फाऊंडेशनच्या वतीने विश्लेषणासह देण्यात येणार आहेत. या शिबिरात कै. बब्रूवान विठ्ठलराव काळे आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयातील डॉ.नरेश कोरे, डॉ.अनंत पवार, डॉ. अरुणा रुपनर, डॉ.पल्लवी खंदारे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बोरी येथील टेक्निशिअन पी.पी.परळीकर, तुकाराम पुरी, मोनिका कदम, सी.आर.पांचाळ, डी.आर.शेट्टे आदींनी तपासणी केली.
Comments