लातूर: लातूर येथील महिला शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय को - एज्युकेशनमध्ये समाविष्ट करून ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्ह्यासाठी हे महाविद्यालय कितपत आवश्यक आहे याचे महत्व पटवून देत या महाविद्यालयाच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मिळणे सहज शक्य होते त्यामुळेच हे महाविद्यालय बंद करू नये असे प्रयत्न जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी करून त्याबाबत तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले,
सदर महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला. हा निर्णय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी सुखदायी ठरल्यामुळे विद्यार्थीनींच्या वतीने पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य आगरकर, प्राचार्य कुंभार, विद्यार्थिनी प्रतिनिधी रसिका अंबुरे, गिता माचवे, सुचिता केकान, श्रध्दा आग्रे यांच्यासह भत्तजयुमोचे प्रदेश सरचिटणीस प्रेरणा होनराव यांची उपस्थिती होती.
Comments