लातूर: लातुरात असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलात खेळाडू व नागरिकांच्या मागणीवरून विविध सोय-सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याबाबत पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी वेळोवेळी जिल्हाधिकारी व क्रीडा समितीकडे सूचना केल्या होत्या या सुचनेवरून कामास सुरुवात झालेली असून या कामाची पाहणी पालकमंत्री निलंगेकर यांच्याकडून करण्यात आली.
शहरातील मध्यवर्त्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर शहरासह जिल्ह्यातील अनेक खेळाडू सरावासाठी येत असतात त्याच बरोबर सकाळी व संध्याकाळी शहरातील पुरुष व महिला, नागरिक फिरण्यासाठी गर्दी करतात. या क्रीडा संकुलाच्या मैदानावर विविध सोय-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती.ही मागणी लक्षात घेऊन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा समितीला निर्देश देऊन त्याबाबत वेळोवेळी सूचना केल्या होत्या या सुचनेवरून क्रीडा संकुलाच्या मैदानावर ४०० मीटर जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात येत असून क्रीडा संकुलाला संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. तसेच पहाटे व संध्याकाळी उजेडाची सोय व्हावी या करिता हायमास्ट दिवे बसविण्यात येत असून क्रिकेटसाठी चार खेळपट्ट्याही तयार करण्यात येत आहेत. या कामांना सुरूवात झालेली असून त्याची पाहणी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलिस अधिक्षक डॉ. शिवाजी राठोड, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
तब्बल अर्धा ते पाऊन तास क्रीडा संकुलात फेरफटका मारत असताना पालकमंत्री निलंगेकरांनी संकुलाच्या मैदानावर फिरण्यासाठी आलेल्या पुरुष व महिला नागरिकांसोबत चर्चा केली. क्रीडा संकुलावर असलेल्या सुविधा योग्य प्रकारे आहेत की नाही याबाबत विचारणा करून आणखी काही सोयी उपलब्ध केल्या जाव्यात का अशी विचारणा पालकमंत्री निलंगेकरांनी यावेळी केली. नागरिकांनी क्रीडा संकुलावर निर्माण होत असलेल्या समाधान व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री निलंगेकर यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातूर, नगरसेवक संगीत रंदाळे, गुरुनाथ मगे, चंद्रकांत बिराजदार, शैलेश स्वामी, सौ. वर्षा कुलकर्णी, सौ. श्र्वेता लोंढे, शिरीष कुलकर्णी, निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, बाळासाहेब चाकुरकर आदींसह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments