लातूर: लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नाफेड मार्फत हमीभाव हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. बाजार समितिच्या गुळ मार्केट बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांच्या हस्ते या खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या केंद्रावर ४४०० रुपये हमी भावाने हरभऱ्याची खरेदी केली जाणार आहे . हमीभाव केंद्राच्या शुभारंभास बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, संचालक संभाजीराव वायाळ, तुकाराम आडे, हर्षवर्धन सवई, जागृती- प्रगती या सब एजंट संस्थेचे चिद्रे, उफाडे, जिल्हा विपणन अधिकारी सुमठाणे, कार्यालयातील अधिकारी विलास सोमारे यांच्यासह बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाच्या धोरणानुसार आतापर्यंत २००० शेतकऱ्यांनी हमी भावाने हरभरा विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे .या शेतकऱ्यांचा हरभरा ४४०० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी केला जाणार आहे. लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला हरभरा हमी भावाने विक्री करण्यासाठी जागृती-प्रगती या संस्थेच्या जुने गुळ मार्केट येथील कार्यालयात ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, उपसभापती मनोज पाटील संचालक संभाजीराव वायाळ, तुकाराम आडे व सचिव मधुकर गुंजकर यांनी केले आहे.
Comments