HOME   लातूर न्यूज

कॉंग्रेसने मुख्य बाजारात काढली रॅली, हनुमान चौकात घंटानाद!

टपरीधारकांचे पुनर्वसन, करवाढ, इंधन दरवाढ, एलबीटी रद्द करण्याची मागणी


कॉंग्रेसने मुख्य बाजारात काढली रॅली, हनुमान चौकात घंटानाद!

लातूर : लातूर महानगरपालिकेने आकारलेली बेकायदेशीर अवाजवी घरपट्टी, गंजगोलाईतील टपरीधारकाचे पुर्नवसन व मालमत्त करात केलेली भरमसाठ वाढ तसेच, केंद्र शासनाने केलेल्या इंधन दरवाढीचा निषेध, चुकीची आकारलेली एल.बी.टी. रद्द करण्यात यावी या मागणीसह इतर अनेक मागण्यासाठी लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने घंटानाद रॅली काढण्यात आली. केंद्रात व राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सामान्य माणसाच्या जीवनात अनेक अडचणी वाढल्या आहेत. दररोजच्या जगण्यातही अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याने सर्व सामान्य मेताकुटीला आले आहेत. त्यातच लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनेही बेकायदेशीर अवाजवी घरपट्टी व नळपट्टी केलेली वाढ, व्यापारी संकुलातील गाळे दरवाढ, मालमत्ता करात केलेली भरमसाठ वाढ, चुकीच्या पध्दतीने आकारलेली एल.बी.टी., तसेच केंद्र शासनाने डिझेल व पेट्रोल दरात केलेली वाढ रद्द करावी. यासर्व बाबींचा निषेध व्यक्त करण्यासाठी व गंजगोलाईतील १६२ टपरीधारकांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने येथील हनुमान चौक येथून तापडीया मार्केट, कापड लाईन, गंजगोलाई मार्गे हनुमान चौक अशी घंटानाद रॅली काढली.
या घंटानाद रॅलीतून सामान्यामध्ये जनजागृती व्हावी व कुंभकरणाप्रमाणे झोपलेल्या सरकारला जाग यावी हा उद्देश असल्याचे लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख यांनी यावेळी सांगितले. जोपर्यंत मनपाच्या वतीने मागण्या मान्य करण्यात येत नाहीत तोपर्यंत सामान्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरून हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. लातूरकरांसोबत काँग्रेस सदैव आहे, लातूरकरांवरील अन्याय सहन करणार असे सांगून लातूरकरांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनात सक्रीय सहभाग घ्यावा असे आवाहन मोईज शेख यांनी केले.
या घंटानाद रॅलीमध्ये नागरीकांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला होता. रॅलीमध्ये कार्यकर्त्यांनी मनपाने लागू केलेली बेकायदेशीर करवाढ रद्द करा, व्यापारी संकुलातील गाळे दरवाढ रद्द करा, गंजगोलाईतील टपरीधारकांचे पुनर्वसन करा, मालमत्ता कर कमी करा, पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा असे लिहिलेल्या पाट्या होत्या. या सरकारचे करायचे काय ? या महापौरांचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय, मनपाची करवाढ रद्द झालीच पाहिजे अशा अनेक घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
लातूर शहर काँग्रेसच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या या घंटानाद रॅलीमध्ये लातूर जिल्हा काँग्रेस कमिटिचे अध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, माजी आमदार वैजिनाथ शिंदे, मनपा विरोधी पक्षनेते ॲड. दिप‍क सुळ, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, माजी उपमहापौर कैलास काबंळे, व्यंकटेश पुरी, स्मिता खानापूरे, सपना किसवे, खाजाबानू अन्सारी, दिप्ती खंडागळे, पुजा पंचाक्षरी, लक्ष्मी बटनपूरकर, मिना लोखंडे, शैलजा अराध्ये, केशरबाई महापूरे, अयुब मनियार, सचिन बंडापल्ले, गौरव काथवटे, ॲड. फारूख शेख, प्रदिप राठोड, बिरबल देवकते, सिकंदर पटेल, रत्नदिप अजनीकर, गोरोबा लोखंडे, रमेशसिंह बिसेन, सोनू डगवाले, शाम सुर्यवंशी, सुपर्ण जगताप, बिभीषण सांगवीकर, यशपाल कांबळे, हरीदास मगर, सतिश हलवाई, असिफ बागवान, सुभाष पंचाक्षरी, गणेश भोसले, जफर नाना, रईस टाके, ॲड. बरूळे पाटील, दिनेश राकोंडे, सय्यद रफीक, राज क्षिरसागर, मैनोद्दीन शेख, ॲड प्रदिप गंगणे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या यांच्यासह नगरीक मोठ्या संखेने सहभागी होते.


Comments

Top