HOME   लातूर न्यूज

स्वछता सर्वेक्षणच्या अडीचशे कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

आज पगार न मिळाल्यास उद्यापासून काम बंद!


स्वछता सर्वेक्षणच्या अडीचशे कर्मचाऱ्यांचे पगार रखडले

लातूर: लातूर महानगरपालिका आणि जनआधार स्वयंसेवी संस्था यांनीं कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखवून लातूर शहरात स्वछता अभियान राबविले जात आहे. मोठा गाजावाजा करून गेल्या महिना- दोन महिन्यात सुमारे ११० स्वछताताई, ३५ घंटागाडी, ३० निरीक्षक, घंटागाडीवरील लेबर, वाहनचालक व इतर कामगार, कर्मचारी असे सुमारे २५० कर्मचारी कार्यरत आहेत. गेल्या महिन्यात दिल्लीचे पाहणी पथक आल्याने या कर्मचाऱ्यांकडून प्रचंड काम करून घेण्यात आले. मनपाने, सत्ताधाऱ्यांनी याचा मोठा गाजावाजा करून श्रेय घेतले. पण जे कर्मचारी, कामगार १३/१४ तास शहर स्वछतेसाठी राबत आहेत. त्यांना गेल्या अडीच महिन्यापासून पगारच अडा केलेला नाही. हे सगळे कर्मचारी, कामगार दलित, बहुजन आहेत. त्यांच्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे दिवाळीचाच सण असतो. पण या सणाला देखील त्यांना पगार नाही. त्यामुळे मनपा आणि जनाधार संस्थे विरोधात सन्ताप व्यक्त केला जात आहे. १३ एप्रिल रोजी पगार मिळाला नाही तर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा या कामगार, कर्मचाऱ्यांनीं दिला आहे. महानगर पालिकेतील सत्ताधाऱ्यांसाठी ही शरमेची बाब समजली जाते आहे.


Comments

Top