लातूर: शहरतील क्रियाशील व सातत्याने प्रयोगशील असणारे कॉंग्रेसचे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांचा राजकीय तथा सामाजिक कार्यातही सक्रीय सहभाग असतो. नुकतेच त्यांनी स्वच्छता उपक्रमामध्ये भरीव कार्य केले आहे. प्रभागात ओल्या कचर्यापासून खत निर्मिती प्रकल्पही राबविला आहे. त्याची बाजारपेठेत थेट विक्रीही करून दाखविली. तसेच टाकाऊ प्लास्टीकपासून डांबरी रस्ताही विकसित केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत मराठवाडा सेल्स असोसिएशच्या वतीने त्यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
मनपात विरोधी पक्षात असूनही उल्लेखनीय कार्य करणारे नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांचे कार्य उत्तम आहे. त्यांनी यापूर्वी मनपाचे प्रभाग सिमिती परीवहन समिती व स्थायी समितीचे सभापतीपदही भुषविले आहे. याकाळातही त्यांची कामगिरी अतिशय चांगली राहिली आहे यासाठी त्यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. यावेळी मराठवाडा सेल्स असोसिऐशनचे शेख नसीर, सूर्यकांत मिटकरी, संतोष गुरव, अरविंद आकुडे, जनार्धन भावे, विकास चव्हाण, शिवा मंटुरे, सत्तार तांबोळी, मिथीलेश जोशी, व्यंकटेश गोजमगुंडे आदी उपस्थित होते.
Comments