लातूर: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपुरातील निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा शालेय पोषण आहार कामगार संघटनेने दिला आहे.रज्यातील इयत्ता पहिली ते आठवी वर्गात शिकणार्या ६ ते १४ वयोगटांतील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत शालेय पोषण आहार पुरवठा केला जातो. कामगारांच्या प्रलंबित मागण्याबाबत अनेक वर्षे अंदोलन करुनही शासन दुर्लक्ष करईत आहे. कामगारांना १० महिन्यांएवजी १२ महीने मानधन द्यावे. कामगारांना समाजिक सुरक्षेसह ग्रॅच्युईटी, प्रॉव्हिडंट फ़ंड, पेन्शन लागू करावी. दरवर्षी दोन गणवेश, धुलाई भत्ता द्या. मानधन व आहार बिल नियमित वितरित करावा. इंधन, भाजीपाला, पुरक अहार निधीत महागाईनुसार तरतुद करावी. आदी मागण्यांसाठी अर्थमंत्र्याच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
Comments