HOME   लातूर न्यूज

परिवहन कर्मचार्‍यांचा उपोषणाचा इशारा


परिवहन कर्मचार्‍यांचा उपोषणाचा इशारा

लातूर: प्रलंबित मागण्यांसाठी राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने १ मे रोजी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर एक दिवसाचे लक्षणिय उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. बाहुजन रा. प. कर्मचारी संघटनेने वारंवार त्रैमासिक बैठकीत, पत्राद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून मागण्यांची सोडवणूक करावी म्हणून प्रयत्न केले. मात्र आजपावेतो मागण्या मान्य झाल्या नाहीत. औसा आगारातील शिपाई जी. बी. शिनगारे यांना अपंगाचे वाहन अद्द्याप दिले नाही. निलंगा आगारातील वाहक एस. जे. कांबळे यांची वार्षिक वेतनवाढ बंद करण्याची चुकीची शिक्षा केल्याविरुद्ध कामगार न्यायालयीन प्रकरण निकाली निघाले असताना वेतनवाढ दिलेली नाही. याबाबत विधी शाखेकडून चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. करागीर डी. पी. शिकरे यांचे सेवानिवॄत्तीच्या वेळी रजा पुस्ताकात कपात केलेल्या रजेचे वेतेन दिले गेलेले नाही. याशिवाय, डी. टी. पत्की, ए. एम. पिडगे, कातकडे यांच्या प्रकरणात अजून न्याय मिळालेला नाही. या मागण्यांसाठी १ मे रोजी कामगार दिनाचे औचित्य साधून उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे सचिव विष्णु जाधव यांनी दिला आहे.


Comments

Top