HOME   लातूर न्यूज

आसिफाला न्याय द्या, काँग्रेसचा लातुरात कँडल मार्च


आसिफाला न्याय द्या, काँग्रेसचा लातुरात कँडल मार्च


लातूर: उन्नाव - कठुवा आणि सुरत या ठिकाणी घडलेल्या अमानवीय बलात्काराच्या घटना, देशात वाढत चाललेली गुन्हेगारी, बोकाळलेला भ्रष्टाचार आणि त्याला प्रतिबंध घालण्यात सरकारला येत असलेले अपयश याच्या निषेधार्थ लातूर शहर जिल्हा कॉंग्रेस मिटीच्यावतीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव तथा माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात लातूर येथे रात्री १० वाजता गंजगोलाई ते गांधी चौक दरम्यान कँडल मार्च काढण्यात आला. आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या कँडल मार्चमध्ये लातूर ग्रामीणचे आमदार ॲड. त्र्यंबक भिसे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, मनपा स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर, विरोधी पक्ष नेते ॲड. दिपक सूळ, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोईज शेख, लातूर तालुका काँग्रेस अध्यक्ष दगडूसाहेब पडिले, एस.आर.देशमुख, आबासाहेब पाटील, श्रीशैल्य उटगे, कल्याण पाटील, विक्रांत गोजमगुंडे, पृथ्वीराज सिरसाठ, विद्याताई पाटील, सुनिताताई आरळीकर, सपना किसवे, स्मिता खानापूरे यांच्यासह लातुर शहर जिल्हा कॉंग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, आजी व माजी नगरसेव, नगरसेविका, महिला काँग्रेस विभाग, अनुसूचित जाती-जमाती विभाग, ओबीसी काँग्रेस विभाग, अल्पसंख्यांक काँग्रेस, युवक कॉंग्रेस, एनएसयूआय विभाग, शिक्षक काँग्रेस सर्व सेलचे पदाधिकारी, सेवा दल, विलासराव देशमुख युवामंच सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरीक मोठया संख्येने सहभागी झाले होते.


Comments

Top