लातूर: एका मुलीच्या लग्नाच्या नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यासाठी १५०० रुपयांची लाच घेताना विवाह नोंदणी कार्यालयातील कनिष्ट लिपीक शोभा खेडेकर यांना रंगेहात पकडण्यात आले. आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास विवाह नोंदणी कार्यालयातच ही कारवाई झाली. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक संजय लाठकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक माणिक बेद्रे, कुमार दराडे यांनी सापळा रचला होता. तो यशस्वी करण्यासाठी पोलिस हेड कॉन्स्टेबल पडीले, पस्तापुरे, डांगे, देशमुख, शेळके, भोंग, धारेकर, स्वामी, सुरवसे, विभुते, सुडे, गुंडरे, महाजन यांनी परिश्रम घेतले असे एसीबीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Comments