HOME   लातूर न्यूज

दिलीपरावजींच्या वाढदिवसानिमित्त १६५ जणांची मोतीबिंदू तपासणी


दिलीपरावजींच्या वाढदिवसानिमित्त १६५ जणांची मोतीबिंदू तपासणी

लातूर: सहकाररत्न, माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आधार फाऊंडेशन, धनेगाव, उदयगीरी लायन्स नेत्रालय व युवक काँग्रेस खरोळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन खरोळा येथे आयोजीत करण्यात आले होते. या शिबीरात १६५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. पैकी २५ रुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रीयेसाठी शिफारस करण्यात आली. पैकी पहिल्या टप्यात १३ रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रीयेसाठी उदयगीरी लायन्स नेत्रालय उदगीर येथे पाठविण्यात आल्याची माहिती शिबीराचे आयोजक आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा रेणा साखरचे संचालक प्रविण हणमंतराव पाटील यांनी दिली. या शिबिराचे उद्घाटन लातूर ग्रामीणचे आमदार अॅड.त्र्यंबकनाना भिसे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रेणा साखर चे चेअरमन आबासाहेब पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून, रेणा साखर चे व्हाईस चेअरमन सर्जेराव मोरे, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष लालासाहेब चव्हाण, रेणा साखर चे संचालक स्नेहलराव देशमुख, रेणा साखरचे संचालक चंद्रकांत सुर्यवंशी, रेणाचे माजी संचालक विश्वासराव देशमुख, सरपंच सौ. कल्पना उकर्डे, केदारनाथ पिंपळे, अनुरथ राऊतराव, शिकुर कोतवाल, शब्बीर कोतवाल, नरहरी अण्णा फुलारी, विश्वभंर पिंपळे, संजय देशमुख, श्यामसुंदर उपाध्याय, रमाकांत तत्तापुरे, बालासाहेब आडतराव, डॉ. अनंत कलमे आदी उपस्थित होते. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी शिबीराचे आयोजक आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा रेणा साखरचे संचालक प्रविण हणमंतराव पाटील, रेणा साखरचे संचालक अनंतराव दौलतराव देशमुख, उदयगीरी लायन्स नेत्रालय, उदगीरचे नेत्र तज्ञ कृष्णा मुरारी, लातूर ग्रामीण युवक काँग्रेसचे सरचिटणीस मंचक राऊतराव, धनंजय देशमुख, सुदाम राऊतराव, युवक काँग्रेस खरोळा विश्वनाथ कागले, धनराज देशमुख, सोमनाथ गौंड, जावेद शेख, राजु कांबळे, गजानन राऊतराव, सुरेश घाडगे, अनिल भरबडे, वैभव भोसले, व्यंकट चिंते, हनुमंत राऊतराव, संजय राऊतराव, संजय ढाले, संदीप देशमुख, लिंगराज ढाले, हरिश पिंपळे, गोविंद आदुडे, वैजनाथ टोंपे, कमलाकर आडतराव, अविनाश राऊतराव, ज्योतीराम कागले, सुरेश घाडगे, अक्षय देशमुख, अमर राऊतराव, निलेश घाडगे, सचिन रोही, वैभव भोसले आदींनी प्रयत्न केले.


Comments

Top