HOME   लातूर न्यूज

महापूर व वरवंटीकरांसोबत आ. अमित देशमुख यांची विकास कामाबाबत चर्चा


महापूर व वरवंटीकरांसोबत आ. अमित देशमुख यांची विकास कामाबाबत चर्चा

लातूर: लातूर तालुक्यातील महापूर व वरवंटी या गावांना माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भेट देऊन ग्रामस्थासमवेत विविध विकास कामे व समस्यांविषयी चर्चा केली. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष दगडूसाहेब पडिले, लातूर तालुका पंचायत समितीचे उपसभापती दत्ता शिंदे, बाजार समितीचे उपसभापती मनोज पाटील, जिल्हा परिषद सदस्य परमेश्वर वाघमारे आदी उपस्थित होते.
या गाव भेटी दरम्यान स्थानीक आमदार विकास निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा आढावा आमदार अमित देशमुख यांनी घेतला. यावेळी गावातील नागरिकांनी काही सुविधा मिळणे संदर्भात मागणी केल्या. या संदर्भात आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विकासकामे तातडीने केली जातील असे सांगीतले. यावेळी वरवंटी येथील सरपंच दुशंत वाघमारे, उपसरपंच दिलीप चिकटे, दिगंबर माने, ब•ाराज लांडगे, दत्ता माने, अशोक कांबळे, तर महापूर येथील सरपंच शिवाजी बनसोडे, पंडितराव ढमाले, उपसरपंच प्रविण कुलकर्णी, सोसायटीचे चेअरमन दिलीप माने, अनिल माने, रमेश माने, संतोष भोसले, अॅड.गणेश माने, शिवाजी माने, माणिकराव माने, आनंत माने, मोतीराम चव्हाण, हणमंत नागराळे, उत्तम वरवटे, बालाजी मोहिते, श्रीकृष्ण माने, उत्तम बनसोडे आदीसह ग्रामस्त उपस्थित होते.


Comments

Top