HOME   लातूर न्यूज

लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता हवी- आ. देशमुख


लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता हवी- आ. देशमुख


लातूर: लिंगायत समाजाची संस्कृती, प्रथा, परंपरा व दैनदिन रितीरीवाज वेगवेगळे आहेत. त्यांची स्वतंत्र व वेगळी ओळख आहे. या समाजात अनेक पोटजातीचा समावेश आहे या सर्वामध्ये एक सांस्कृतिक ऐक्य आहे. या आधारावर लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्म व अल्पसंख्याकाचा दर्जा देणेबाबत ठ्या प्रमाणात मागणी आहे. याची दखल घेऊन कर्नाटक मधील राज्य सरकारने लिगायत धर्मास स्वतंत्र धर्म म्हणून मान्य करून या मागणीला मान्यता देणे बाबत केंद्रसरकारकडे शिफारस केली आहे. कर्नाटक सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणुन मान्यता मिळावी असे मत माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले आहे. जगत्‌ ज्योती महात्मा बसवेश्वर सार्वजनीक जयंती महोत्सव २०१८ समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि.१८ रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी मंत्री आमदार बसवराज पाटील मुरुमकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड व्यंकट बेद्रे, उपाध्यक्ष बी.व्ही.मोतीपवळे, स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर, विरोधी पक्षनेते अॅड दिपक सुळ, माजी महापौर प्रा.स्मिता खानापूरे, प्रदेश सरचिटणीस सपना किसवे, नगसेविका पुजा पंचाक्षरी, उत्सव समितीचे अध्यक्ष राजकुमार नाईकवाडे, उत्सव समितीचे मार्गदर्शक रमेशअप्पा हालकुडे, किशोर राजुरे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने लिंगायत समाजाबाबत योग्य ते पाऊले उचलून समाजाची मागणी विचारात घेऊन लिंगायत धर्माला स्वतंत्र मान्यता देऊन न्याय द्यावा. लोकनेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना भारतात प्रथमच महात्मा बसवेश्वर जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेतला. ही लिंगायत समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. लातूर महानगरपालिकेच्या वतीने बसवेश्वर कॉलेज परिसरात सिंहासनारुढ महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा बसवण्यात आला. लातूर महानगरपालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात लिंगायत समाजासाठी विशेष तरतूद करावी व सध्याच्या पुतळ्याच्या परिसरात सुशोभिकरण करावे, राज्यसरकारने सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी ठोस पाऊले उचलावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार बसवराज पाटील व डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमीत्ताने सर्वांना शुभेच्छा देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सिद्रामप्पा पोपडे, उमाकांत कोरे, मनोहरदादा कोरे, लक्ष्मीकांत मंठाळे, अभिमन्यु रासूरे, विजय मानकरी, सरोज कवठाळे यांच्यासह बसव जन्मोत्सव समितीचे सदस्य व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Comments

Top