लातूर: जिल्ह्यासाठी सन २०१६-२०१७ या अर्थीक वर्षात मंजूर झालेल्यापैकी ५५ कोटींचा निधी सरकारला परत गेला आहे. पावसाळा बरेच दिवस चालू राहिल्याने या वर्षात मंजूर झालेली कामे प्रशासनाला पुर्ण करता आली नाहीत. कामे करण्यासाठी मुदतवाढ देऊनही ती पुर्ण करता न आल्यामुळे निधी परत गेला आहे. त्यानंतरच्या वर्षातही आलेला सहा कोटी ७५ लाखांचा निधी परत गेला आहे. दरम्यान, निधी परत जण्याच्या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून अभियानात मंजूर कामे पूर्ण करण्यासाठी चांगलाच तगादा लावला आहे. यातूनच चालू वर्षात सात कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाची विविध कामे करण्यात येत आहेत. सुरवातीचे दोन वर्ष अपुरा पाऊस झाल्यने जिल्ह्यात अभियानात मोठया संख्येने कामे झाली. त्यानंतरच्या सलग दोन वर्षात पाऊस झाल्याने या कामांना अडचण झाली. सन २०१६-२०१७ या वर्षातील कामांवर पावसाचा चांगलाच परिणाम झाला. नदी व नाल्यांत पाणी साचल्याने नवीन सिमेंट नाला बांध तसेच अस्तित्वात असलेल्या बांध तसेच पाझर तलावांच्या दुरूस्तीची कामे करता आली नाहीत. शेतातील उभ्या पिकांमुळे कंपार्टमेंट बंडिंगची कामे सुरूच झाली नाहीत. यामुले कामे न झाल्याने या वर्षात मंजूर ९५ कोटी निधीपैकी तब्बल ५५ कोटींचा निधी सरकारला परत करावा लगला. त्यानंतरच्या २०१७-२०१८ या अर्थिक वर्षातही मंजूर सात कोटींपैकी केवळ २५ लाख रूपये खर्च झाले.
Comments