HOME   लातूर न्यूज

पिकांना ठिबक-तुषारनेच पाणी द्या अन्यथा परवाना रद्द

अद्ययावत सिंचन पद्धतीचा वापर करण्याची पाटबंधारे विभागाची सक्ती


पिकांना ठिबक-तुषारनेच पाणी द्या अन्यथा परवाना रद्द

लातूर: लातूर पाटबंधारे विभाग क्र. ०२ लातूर या कार्यालयांतर्गत असलेले मध्यम, लघु, साठवण व को. प. बंधारे या मधुन सिंचनासाठी घेतलेल्या पाणी परवान्यानुसार कोणत्याही पीकास पाणी देण्यासाठी, जलसंपदा विभागाने सिंचन प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात सुक्ष्म सिंचनाचे उद्दिष्ट ठेवून वितरण व्यवस्था करण्याचे धोरण स्विकारले आहे. सर्व पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करणे अनिवार्य आहे. सर्व पाणी परवानाधारक व इतर शेतकर्‍यांना आवाहन करण्यात येते की, ठिबक-तुषार सिंचन पध्दतीचाच वापर करावा. जे पाणी वापरकर्ते ठिबक-तुषार सिंचन पध्दतीचा वापर करणार नाहीत, त्यांचा पाणी परवाना रद्द करण्यात येईल व महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम सन 1976 च्या कलम 51 (क) व कलम 97 (अ) नुसार विद्युत पुरवठा खडीत करुन उपसा सिंचनाचे यंत्र सामुग्रीसह जप्त केले जाईल. याची नोंद घेऊन जलसंपदा विभागास सहकार्य करावे, असे कार्यकारी अभियंता लातूर पाटबंधारे विभाग क्र. ०२ लातूर यांनी आवाहन केले आहे.


Comments

Top