HOME   लातूर न्यूज

लातूर पत्रकार संघाची निवडणूक धर्मादाय मार्फत होणार

जुन्या कार्यकारिणीला घटनात्मक अधिकार नव्हते, चेंज रिपोर्टही अमान्य


लातूर पत्रकार संघाची निवडणूक धर्मादाय मार्फत होणार

लातूर: लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवडणूक धर्मादाय मार्फत होणार असून, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आरएन कराड (निरीक्षक न्यास नोंदणी) यांची नियुक्ती सहाय्यक धर्मादाय आयुक्त महेश ठवरे यांनी केली आहे. गेली दोन वर्षांपासून पत्रकार संघाचे कामकाज ठप्प झाले होते म्हणून शिखर संघटनेने चंद्रकांत झेरीकुंठे यांच्या अध्यक्षतेखाली पंधरा सदस्यीय अस्थाई समिती स्थापन करुन या समितीमार्फत सदस्य नोंदणी करुन निवडणुका घेण्याचा अधिकार दिला होता. पत्रकार संघ नोंदणीकृत झाल्यापासून सात निवडणुका झाल्या. त्यापैकी केवळ पहिल्याच कार्यकारिणीची नावे धर्मादायच्या शेड्युल वनवर आहेत. त्यानंतरच्या कार्यकारिणीची नावे शेड्युल वनवर आली नाहीत. त्यामुळे त्यांच्या कामाला घटनात्मक अधिकार प्राप्त होत नव्हते आणि चेंज रिपोर्टही मंजूर झाले नाहीत. अस्थायी समिती मार्फत निवडणूक घेवून पुन्हा अनाधिकृत कार्यकारिणी निवडण्याऐवजी धर्मादाय मार्फत निवडणूक घेवून कायदेशीर कार्यकारिणी निवडण्याचा निर्णय अस्थायी समितीने घेतला आहे. म्हणून संघटनेच्या हिताचा विचार करुन पत्रकार संघाची निवडणूक शांततेत पार पाडून निवडणूक निर्णय अधिकार्‍यास सहकार्य करावे, असे आवाहन लातूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत झेरीकुंठे यांनी केले आहे.


Comments

Top