लातूर: लातूर वृक्ष चळवळी अंतर्गत आता ब-याच महिला जोडल्या गेल्या आहेत. मागील वर्षी त्यांनी अनेक उपक्रम राबवले. त्यामुळे अनेक शाळा वृक्ष संवर्धन प्रबोधन चळवळीत सहभागी झाल्या. दिवाळी संक्राती निमित्त वृक्ष लागवड, संगोपन हे उपक्रम राबवले गेले. आता लातूर वृक्ष महिला टीम तर्फे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन संदर्भात वासनगाव हे गाव दत्तक घेण्यात आले आहे. या महिला टीम मध्ये आयएमए, तनिष्का ग्रुप, महिला बचत गट, प्राध्यापिका, गृहिणी सहभागी झाल्या. तसेच हरंगुळ, कासरगाव, हणमंत वाडी ही गावेही वृक्ष संवर्धनासाठी लातूर वृक्ष तर्फे दत्तक घेण्यात आली आहेत. लातूर भोवतालच्या ३० गावात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या निमित्ताने चला खेड्याकडे चला, हा संदेश देण्यात येणार आहे. या संदर्भात महत्वाची बैठक वासनगाव येथे झाली. यावेळी डॉ. नीलम पन्हाळे, डॉ. गणेश पन्हाळे, डॉ. शितल भट्टड, डॉ. वर्षा डोपे, डॉ. संतोष डोपे, डॉ. स्वरूपा देशमुख, डॉ. पूनम गिते, डॉ शितल रेड्डी, सौ सुरेखा गरड, अर्चना माने, रुक्साना मुल्ला, अॅड विशाल थोरमोटे, ग्रामसेवक, सुपर्ण जगताप, डॉ. पवन लड्डा, इम्रान सय्यद, डॉ. भास्कर बोरगावकर, अभिजीत तिवारी, कपिल धावरे, स्वराज तिळकारी, योगेश गडदे, सुदीप पाटील, गावातील जेष्ठ मंडळी उपस्थित होती.
Comments